कुरखेडा शहरात जुनी पेन्शनसाठी थाळी नाद आंदोलन

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : जुनी पेंशनच्या मागणीसाठी एकीकृत कर्मचारी संघटनेच्या वतीने कुरखेडा शहरातून रॅली काढत तहसील कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले.
जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मागील १४ मार्च पासून जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय, खाजगी शिक्षक संघटनेनेने बेमुदत संप पुकारलेला आहे. मात्र, अद्याप मागणीवर तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलनातील विविध आयूधाचा वापर करीत मागण्यांकडे लक्ष वेधत आहेत. दरम्यान, तहसिल कार्यालय, बाजारपेठ, पंचायत समिती कार्यालय ते पून्हा तहसिल कार्यालयापर्यंत थाळी नाद करीत रॅली काढण्यात आली. या आंदोलनात कर्मचारी संघटना समन्वय तथा सनियंत्रण समीतीचे निमंत्रक लिकेश कोडापे, सहनिमंत्रक काशीनाथ कूंडगीर, प्रसिद्धी प्रमूख संजय मेश्राम, समन्वय प्रमुख गौतम लांडगे, लिना भोयर, चंन्द्रकला हिडामी, खिरेन्द्र बांबोळे, लालचंद धाबेकर, कर्मचारी महासंघाचे अरविंद मांडरेवार, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निंदेकर, सचिव लोमेश कीरणापूरे, निलेश जौजाळकर, उपाध्यक्ष गौतम गेडाम, अशोक प्रधान, किशोर शिंन्द्राम, जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष तुळशीदास नरोटे, चंन्द्रकांत नरूले, उईके, राऊत, विवेक विरुटकर, महसूल कर्मचारी संघटनेचे अविनाश चून्ने, सक्सेना, जितेंद्र दोडके, एकनाथ जांभूळकर, संदीप शेंडे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे गिरीधर मेश्राम, उमेश गेडाम, एकनाथ पील्लारे, वनकर्मचारी संघटनेचे संदीप शेंडे, नितुपाल नाकाडे ,वनरक्षक शेख, कादर शेख, कास्ट्राईबचे विनोद मडकाम, प्रेमानंद लोनारे, मूरलीधर सयाम, ज्ञानेश्वर भोगे, विनोद धाईत, शिवा भोयर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते