आजपासून मुतनूर पहाडीवर उसळणार भक्ताचा जनसागर

गुढीपाडव्यानिमित्त भव्य महादेव पूजेचे आयोजन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त व अतिदुर्गम भागात वसलेल्या ग्रामपंचायत पावीमुरंडा अंतर्गत येणाऱ्या मुतनुर येथील डोंगरावर कुपारलिंगो देवस्थान समिती ग्रामसभा मुतनुर यांच्या वतीने गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या निमित्ताने 21 व 22 मार्च रोजी भव्य महादेव पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महादेवाच्या पुजेसाठी येथे भक्ताचा जनसागर उसळणार आहे.
नृत्य प्रमुख अनिल नरोटे, मुनील पदा, काशिनाथ आतला, संजय कुसुर यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता आदिवासी गोंडी संस्कृतीमधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 मार्च रोजी सकाळी 6 वाजता मुतनुर डोंगरदेव पारी कुपारलिंगो येथे भगवान महादेवाची महापूजा होणार आहे. सकाळी 11 वाजतापासून महभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला मुतनुर, पावीमुरांडा, लेनगुडा, पुसेर, काळशी, ढेकणी, जमगाव, जडेगाव, ताडेवाही, आबापूर, पांढरी भटाळ, बानगुडा, कोटरी, येडानुर, मुरमुरी, मालेर माल, रावनपल्ली, बावनचूवा, गारंजी, भस्मलटोला, एटावाही, गळदापली, कोंदावाही, कोमटी, माडेआमगाव, सोमनपल्ली, कळमगाव, पावीलसनपेठे, पयडी, गडेरी, कुरुड आदी गावातील आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहेत. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामसभा अध्यक्ष रमेश नरोटे, सचिव विनोद कोंदामी, कोषाध्यक्ष रामदास आतला, सहसचिव श्रीरंग नरोटे यांनी केले आहे.
दोन दिवस राहणार भाविक, पर्यटकांची गर्दी
मुतनूर पहाडीच्या खाली वसलेले मुतनूर हे गाव पावीमुरांडा ग्रापं अंतर्गत येते. येथे गुढीपाडव्याला दोन दिवस जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृतीनुसार पूजाअर्चा व परंपरागत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी केवळ जत्रेसाठीच लोक येथे येत होते. मात्र आता हळूहळू या पहाडीबाबत दूरदूरवर माहिती पोहोचत असल्याने सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. शासन व प्रशासनाने या पहाडीच्या विकासाकडे लक्ष दिल्यास या क्षेत्रात मुतनूर पहाडी एक पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येवू शकते.