वाघाच्या हल्ल्यात जखमी बैलावर प्रथमोपचार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शहरातील सेमाना देवस्थान परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बैलावर काँग्रेसच्या भावना वानखेडे यांच्या पुढाकारातून प्रथमोपचार करून जीवदान देण्यात आले.
चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरात सकाळच्या सुमारास जखमी अवस्थेत अज्ञात बैल होता. ही बाब सेमाना देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या भावना वानखेडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी यासंदर्भातील माहिती डॉ.मनोज कुळमेथे यांना दिली. डॉ. कुळमेथे यांनी तत्काळ येऊन बैलावर उपचार करीत जीवनदान दिले. विशेष म्हणजे, सदर बैलावर वाघाने हल्ला चढविला होता. मात्र, बैलाने वाघाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. या घटनेत बैल गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी भावना वानखेडे, डॉ.मनोज कुळमेथे, संजय वानखेडे, गोलु कोडापे, आकाश मेश्राम, यादव सोमणकर, दिलिप मेश्राम उपस्थित होते.