आविस व अजय कंकडालवार मित्र परिवाराचा उपक्रम : ११८ जोडपे अडकले विवाह बंधनात

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळाच्या पुढाकारातून एकाच मंडपात ११८ जोडपे विवाह बंधनात अडकले. सोबतच नवदांपत्यास माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते मंगळसूत्र, डोरले, वधू-वरांना नवे कपडे, संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिपचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली कंकडालवार, आविसचे नेते नंदू मट्टामी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र आत्राम, रियाज शेख, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, अहेरी पंसचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम, माजी उपसभापती गीता चालुरकर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबले, नगरसेविका मीना ओंडरे, जोती सडमेक, माजी जिप सदस्य अजय नैताम, माजी जिप सदस्या सुनीता कुसनाके, माजी पंस सदस्या शितल दुर्गे, योगीता मोहूर्ले, छाया पोरतेट, संगीता दुर्वा, इंदारामचे सरपंचा पेंदाम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, रेपनपलीचे सरपंचा लक्ष्मी मडावी, दामरंचा सरपंचा किरण कोडापे, नागेपलीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच वैभव कंकडालवार, उपसरपंच शानगोंडावार, उपसरपंच हरिष गावडे, माजी सरपंच गुलाब सोयाम आदींनी उपस्थिती दर्शवून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. सदर विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लग्न सोहळ्याच्या यशस्वीसाठी नरेंद्र गर्गम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, शामराव राऊत, शंकर सिडाम, सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, तेजू दुर्गे, प्रमोद कोडापे आदिनी सहकार्य केले.
सदर लग्न सोहळा दोन वर्षापुर्वी नियोजन केले होते. मात्र, कोरोना संकटामुळे घेता आला नाही. दरवर्षी व्येंकटरावपेठा येथे लक्ष्मी देवी बोनलू येरमा परिवाराकडुन साजरी केली जाते. विवाह बंधनात अडकलेले जोडपे सर्व जाती धर्मांचे होते. सर्वांच्या मदतीने हा विवाह सोहळा पार पडला असून येणाऱ्या काळाता यापेक्षा मोठा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येणार असल्याची मंडळाने दिली.