कोरचीतील निर्मल टी-पॉईंट हॉटेलवर धाड ; दारुसह 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

GADCHIROLI TODAY
कोरची : कोरची पोलिसांनी निर्मल टी-पॉइंट हॉटेलवर धाड टाकून 64 हजार 900 रुपये किंमतीचा दारूसह मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली.
कोरचीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी व पोलीस चमूने मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्मल टी पॉईट हॉटेल व बाजूला असलेला नवीन इमारतीमध्ये धाड टाकली असता, 64 हजार 900 रुपयांची अवैध विदेशी दारुचा साठा मिळून आला. यामध्ये रॉयल स्टेज कंपनीच्या 5 बंपर, मॅगडोल नं. 102 बंपर, लेमोन्ट प्रीमियम स्ट्राँग कंपनी बियर 36 कॅन, मँगडोल नं. 1 कंपनी 52 निप, गोवा व्हिस्की 57 निप, रॉयल स्टेज कंपनी 45 निंप, रॉकवेल कंपनीचे लाल रंगाचा दोन खाण्याच्या फ्रीजमध्ये लेमोन्ट प्रीमियम स्ट्रॉंग कंपनीचे बियरचे 12 बॉटल, ड्रिंक प्योर कंपनीच्या 1 लिटर मापाच्या पाण्याने भरलेल्या सीलबंद प्लास्टिक बॉटल असा एकूण 64 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल चालक निर्मल धमगाये, तरुण धमगाये यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.