सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या उपस्थितीत बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉलचे थाटात उद्घाटन

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शहरातील एकमेक नवनिर्मित ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’चे आज प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला.
मागील 29 वर्षापासून जिल्हावासीयांना शहरातील एकमेक ‘बी-फॅशन प्लाझा’ हे प्रतिष्ठान उच्च दर्जाच्या कापडांचा माफक दरात पुरवठा करीत आहे. उच्च दर्जा आणि माफक दर या ठिकाणी मिळत असल्याने जिल्हाभरातील ग्राहकांचे बी-फॅशन प्लाझा आकर्षण ठरत आले आहे. दरम्यान, याहीपुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकत मूल मार्गावरील शहराच्या मध्यभागी भव्य अशा ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ची निर्मिती केली आहे. उभारण्यात आलेल्या या शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांना अधिक सोयीस्कर व कपड्यांची सर्व व्हेरायटी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या एकाच वास्तूमध्ये कपड्यांसह फुटवेअर, बॅग व कॉस्मेटिकच्या क्षेत्रातील ब्रॅंडेड साहित्य ग्राहकांना मिळणार आहेत. गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये असणारे सर्व कपडे येथे उपलब्ध आहेत.
गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलेल्या या शॉपिंग मॉलच्या उद्घाटनाप्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, सचिव गुरुदेव हरडे, सदस्य दिलीप सारडा, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे आदींनी भेट दिली. यावेळी बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, हिमांशू देवकुले, सुरेश देवकुले, विजय देवकुले, डॉ. राज देवकुले, ज्योती देवकुले, पुष्पलता देवकुले, कविता देवकुले व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
किशोरी शहाणे यांनी केले शॉपिंग मॉलचे कौतुक
सर्वप्रथम सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ या नवीन वास्तूचा शुभारंभ केल्यानंतर शोरूमच्या मुख्य भागात असलेल्या ‘बाप्पा’ व श्री साईबाबांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शोरूमची पाहणी करून देवकुले परिवारासोबत हितगुज साधला. शोरूमच्या पाहणीदरम्यान वातानुकुलीत, सुंदर, सुसज्ज, शानदार बैठक व्यवस्था, ग्राहकांना आवडेल अशा कापडांची पाहणी करून त्यांनी देवकुले परिवाराने साकारलेल्या कापड शोरूमचे कौतुक केले. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये असलेल्या शोरूमपेक्षाही सुंदर ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे आपण निश्चितच गडचिरोलीत खरेदीसाठी येणार असल्याचे आवर्जून सांगितले. गडचिरोली शहरातील व जिल्ह्यातील ग्राहकांसाठी एक शानदार भव्य शोरूम उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील ग्राहकांनी ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी केले.