26 ला पाच केंद्रांवर होणार सेट परीक्षा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परिक्षा (SET Exam) रविवार, 26 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत पाच परिक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, महिला महाविद्यालय गडचिरोली, शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व कार्मेल हायस्कुल या केंद्रावर एकुण 1620 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावे. परीक्षा केंद्रावर कुणीही मोबाईल आणू नये तसेच दिलेल्या वेळेच्या 30 मिनीटे अगोदर हजर राहावे. दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन शांततामय वातावरणात परिक्षा पार पडेल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ तथा समन्वयक सेट परिक्षा डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.