कर्नाटक राज्यातील दोघांकडून लाखोंचा गांजा जप्त

GADCHIROLI TODAY
-धानोरा शहरात कारवाई
गडचिरोली : धानोरा शहरातील नविन बस स्टॉप समोरील पटांगणात आढळून आलेल्या दोन संशयितांकडून २ लाख १४ हजार ८५० रुपये किंमतीचा गांजा जप्त केल्याची कारवाई २३ मार्च रोजी गडचिरोली पोलिस दलाने केली. याप्रकरणी जय निशीथ बाला (२२), मनिशंकर नलीतमहान सरकार (३२) दोघेही रा. आर.एस.नंबर २, ता. जवलगैरा, जि. रायचुर या कर्नाटक राज्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. अशातच दोन संशयित इसम बॅगांमध्ये गांजा हा मादक पदार्थ बाळगुन नविन बसस्टॉपकडे पायी येत आहेत. अशा माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन धानोरा येथील नविन बस स्टॉप समोरील पटांगणात आढळुन आलेल्या दोन संशयितांची चौकशी केली. त्यांच्याकडील तिन्ही बॅगांची पंचासमक्ष तपासणी केली असता, त्या बॅगामध्ये फिकट हिरवट रंगाचा उग्र वास येणारा सुखा गांजा वनस्पतीचे एकुण ८ गठ्ठे वजन १९ किलो ०.१५ ग्रॅम तसेच ईतर साहित्य असा एकुण २ लाख १४ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सुधाकर देडे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोहवा पुरुषोत्तम टेंभुर्णे, पोना गितेश्वर बोरकुटे, पोना लक्ष्मीकांत काटेंगे, पोना रुपेश दरों, पोशी अमोल कोराम, पोशी कपील जिवणे, पोशी प्रविण गोडे, पोशी मारोती वाटगुरे, पोशी तुकाराम कोरे, मपोशी प्रिती गोडबोले यांनी केली आहे.