मोफत शिद्यातून गहू गायब ; कुरखेडा शहरातील लाभार्थी वंचित

-पूरवठ्यातील अनियमितता दूर करा- नगरसेवक ऍड. उमेश वालदे
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शासनाने जानेवारी पासून स्वस्त धान्य दूकाना मार्फत वितरित करण्यात येणारा शिधा मोफत देण्याची घोषणा करीत त्याची अमलबजावणी सूद्धा सूरू केली आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून शहर वासीयांना योजनेचा अर्धवटच लाभ मीळत आहे. येथील स्वस्त धान्य दूकानातील मोफत शिधातून महत्वाचा घटक असलेला गहू गायब आहे. लाभार्थाकडून याबाबद तक्रार प्राप्त होताच, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक अॅड उमेश वालदे यांनी गुरुवारी शहरातील काही स्वस्त धान्य दूकानाना भेट देत पूरवठ्यातील अनियमिततेची माहीती जाणून घेतली व प्रशासकीय यंत्रणेने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन गव्हाचा पूरवठा नियमीत करावा अशी मागणी केली.
शहरात ४ स्वस्त धान्य दूकानामार्फत शासकीय धान्याचे वितरण करण्यात येते. या शहरी दूकानात सूद्धा पूर्वी तालुका स्थळावर असलेल्या तहसिल कार्यालयाच्या गोदामातून अन्न धान्याचा पूरवठा करण्यात येत होता. मात्र मागील ५ महिण्यापूर्वी शहरी भाग असलेल्या दूकानात अन्न धान्य पूरवठ्याची जबाबदारी भारतीय खाद्य निगम मार्फत वखार महामंडळाचा गोदामातून शासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भागात अद्यापही तालुका स्थळी असलेल्या गोदामातून अन्न धान्याचा पूरवठा होत असल्याने हा पूरवठा नियमीत व पूर्णपणे मीळत आहे. मात्र, वखार महामंडळाचे गोडाउन हे देसाईगंज व ब्रम्हपूरी येथे असून नियोजनातील त्रूट्यामूळे पूरवठा अनियमीत होत आहे. मागील फेब्रूवारी व सूरू असलेल्या मार्च महिन्याचा तांदूळ पूरवठा करण्यात आला आहे. परंतु गव्हाचा पूरवठा बंद असल्याने शहरातील सर्व सामान्य लाभार्थी शासनाच्या मोफत शिधा योजनेपासून वंचीत आहेत. शहरी कूटूंबातील आहारात गहू हा प्रमूख घटक असतो, परंतु दोन महिन्यांपासून त्याचा पूरवठा बंद असल्याने लाभार्थ्यांना नाईलाजाने खूल्या बाजारातून महागडे गहू खरेदी करावे लागत आहे. सर्व सामान्याची ही आर्थीक कोंडी लक्षात घेता पूरवठ्यातील ही अनियमितता दूर करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अॅड उमेश वालदे यानी प्रशासनाकडे केली आहे.