युवतींनी एकाग्रतेने प्रशिक्षण घेऊन व्यवसाय उभारावे : जिल्हाधिकारी मीणा

किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे उद्घाटन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महिला आर्थिक विकास महामंडळ हे जुने महामंडळ असून महिला बचत गटांवर अतिशय चांगल्या प्रकारे काम उभे केलेले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवती, महिलांना दर्जेदार प्रशिक्षण देवून रोजगार तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. प्रशिक्षणार्थी युवतींनी पूर्ण एकाग्रतेने प्रशिक्षण घेवून व्यवसाय उभारावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेल्फ एम्प्लॉईड टेलर व सिवींग मशीन ऑपरेटर बॅचेसचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याहस्ते माविम च्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अथिती म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेद्र शेंडे उपस्थित होते.
जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला आर्थिक विकास महामंडळ हे १९७५ पासून महिला सक्षमिकरण या विषयावर काम करत असून प्रत्येक तालुक्यामध्ये माविम द्वारा स्थापित CMRC च्या माध्यमातून काम सुरु असल्याचे संगितले. त्याचबरोबर मविमद्वारे राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी, NULM, वनधन, तेजश्री फायनांसिअल सर्व्हिसेस योजना, वॉश कार्यक्रम, अल्पसंख्यांक कार्यक्रम या विविध योजना बाबत माहिती दिली. तेजश्री योजनेच्या माध्यमातून ३४०६ महिलांना व्यवसाय उभारणी केली असून वनधनच्या माधमातून ३ वनधन असून २२ प्रोडेक्टचे कोड ट्रायफॅड अंतर्गत तयार झालेले आहे व जिल्ह्यातील बचत गटातील अनेक महिलांनी प्रक्रिया उद्योग सुरु केल्याचे संगितले. किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत एकूण 6 सीएमआरसीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, विलेज लेव्हल मिल्क कलेक्शन सेंटर, डेअरी आंत्रप्युनुअर, ब्युटीक थेरेपीस्ट, मेकअप आर्टीस्ट, सेल्फ एम्प्लाईड टेलर, सिवींग मशीन ऑपरेटर या सारखे कोर्सचे प्रशिक्षण राबविण्याचे कार्यदेश महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे जिल्हा समन्वयक अधिकारी देवतळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन दिपज्योती सीएमआरसी धानोराचे व्यवस्थापक रसिका मारगाये तर आभार सखी सीएमआरसी सहयोगिनी उज्वला रायपुरे यांनी मानले. यावेळी सहायक सनियंत्रण अधिकारी सचिन नरुले, लिपीक तथा सहाय्यक सतिश प्रधान, सखी सीएमआरसी अध्यक्षा अश्विनी जांभूळकर, सिमा वसाके, यांच्यासह माविम कर्मचारी व सीएमआरसी कर्मचारी उपस्थित होते.