विहीरगाव जंगलपरिसरातील मोहफुलाचा सडवा नष्ट

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : तालुक्यातील विहीरगाव जंगलपरिसरात दारूविक्रेत्यानी दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सडवा व १० लिटर दारू नष्ट केल्याची कृती गाव संघटनेसह मुक्तिपथ तालुका चमूने केली आहे.
विहीरगाव जंगलपरिसरात परिसरातील दारूविक्रेते हातभट्टी लावून दारू गाळतात व जिल्हा मुख्यालयासह परिसरातील विविध गावातील दारूविक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. गाव संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस विभागाने वेळोवेळी कारवाई करून विक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तरीसुद्धा परिसरातील मुजोर दारू विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सोडला नाही. अशातच विहिरीगाव जंगलपरिसरात दारू गाळण्यासाठी विविध ठिकाणी हातभट्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून, विक्रेत्यांचे दारू अड्डे उध्वस्त केले. सोबतच विविध ठिकाणी मिळून आलेला मोहफुलाचा सडवा व १० लिटर दारू नष्ट करण्यात आली.