अ. भा. आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा ; गोंडवाना विद्यापीठाने पटकाविले उपविजेतेपद

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : सुरेश ज्ञानविहार विद्यापीठ राजस्थान येथे पार पडलेल्या ऑल इंडिया आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत उपविजेतेपद पटकाविले.
महिला गटात शासकीय विज्ञान महाविद्यालयातील ईशा फुलबांधे, श्रद्धा येवले, प्रेरणा गेडाम, श्रद्धा रायपुरे, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी सुदेष्णा भैसारे, शिवाजी महाविद्यालय गडचिरोली गायत्री सराटे, निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती इशिका वाकडे, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही ऐश्वर्या बोरकर, पुरुषांच्या संघात शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली निखिल जांभुळकर, प्रज्वल सोनलकर, गोंडवाना विद्यापीठ कुणाल गलवाले, प्रशिल दातार, भगवंतराव बीएड महाविद्यालय अहेरी अनुराग मडावी, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी सचिन रोहनकर, शिवाजी महाविद्यालय निहाल दरी, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी अनिकेत भुरसे यांचा समावेश होता. विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच डॉ. ऐवतीकर, मानकर, संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक डॉ. मार्कंड चौरे यांनींही उत्तम भूमिका बजावली. सर्व खेळाडूंचे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी कौतुक केले आहे.