विनयभंग करणाऱ्यास एक वर्षाचा कारावास

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शौचालयाकरीता गावाबाहेर जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. नितीन अर्जुन कन्नाके (28) रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे.
नितीन कन्नाके हा गावातील एक महिला शौचालयाकरीता गावाबाहेर जंगलामध्ये गेली असता, तिच्या मागेमागे जावून तिचा विनयभंग केला. पीडितेने घडलेली घटना तिच्या घरातील लोकांना सांगितली. घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन आष्टी येथे देण्यात आली. महिला पोलिस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र चामोर्शी न्यायालयात दाखल केले. सदर मामल्यात साक्षीदारांचे पुरावे नोंदवून दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोप नितीन कन्नाके यास कलम 354, 354 (अ) भादंवि अन्वये गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.