खेडेगांव आविका संस्थेच्या सभापतीपदी राजू पुराम तर उपसभापती म्हणून देविदास बंसोड

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : तालुक्यातील खेडेगांव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक, सभापती व उपसभापती पदाची पंचवार्षीक निवडणूक प्रक्रीया आज अविरोध संपन्न झाली. यात सभापती पदावर राजू पुराम तर उपसभापती पदावर देविदास बंसोड यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जिवन पाटील नाट व माजी सरपंच कीशोर तलमले यांचा मार्गदर्शनात संस्थेअंतर्गत स्पर्धा टाळत निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. संचालक मंडळात जिवन केवळराम नाट, लोकचंद विश्वनाथ दरवडे, शंकर हिरामन पाटनकर, नामदेव करंगसू दर्रो, ढुन्नू बल्ली दर्रो, टिकाराम सकरू कुमरे, केवळराम लहू जमदाळ, अंताराम बिरसिंग कुमोटी, शशीकला ज्ञानेश्वर जमदाळ, तूळजाबाई आसाराम गोटा यांची अविरोध निवड झाली होती. आता सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सुद्धा सर्वानूमते अविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सुशील वानखेडे यांनी जबाबदारी पार पाडली .