रामनवमीनिमित्त गडचिरोलीत भव्य रामजन्म महोत्सव

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : विश्व हिंदू परिषद बजरंग दल व रामनवमी सेवा समिती द्वारा श्रीराम जयंती तसेच रामनवमीनिमित्य गडचिरोली येथे भव्य रामजन्म महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रामजन्म महोत्सवादरम्यान स्थानिक इंदिरा गांधी चौकातून शहरातून जाणा-या चारही मुख्य राष्ट्रीय महामार्गावरुन गीत रामायण व सांस्कृतिक गाणे वाजवण्यात येणार आहे. तर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नगर परिषद ते अभिनव लॉनपर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. यादरम्यान नगरातील प्रत्येक वॉर्डांत तसेच बजरंग दल शाखेत पूजाअर्चना करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच रामनवमी सेवा समितीच्या पदाधिका-यांनी केले आहे.