अस्वलाचा जीवघेणा हल्ला ; दोन इसम जखमी

GADCHIROLI TODAY
अहेरी : अस्वलाने दोघांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना मंगळवारी, सायंकाळच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कापेवांचा जंगल परिसरालगत घडली. रमेश सोमा गंधम व बाबुराव मलय्या रामटेके दोघेही रा. छल्लेवाडा अशी जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रमेश गंधम व बाबुराव रामटेक हे दोघेही तेरवीचा कार्यक्रम आटोपून छल्लेवाडा गावाकडे परत येत होते. दरम्यान कापेवांचा जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते दोघेही जखमी झाले. दोघांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेत विचारपूस केली. याप्रसंगी मधुकर सडमेक, राघोबा गौरकर, नामदेव आत्राम, अशोक आईंचवार, रज्जाक पठाण, गणेश उप लपवार, श्रीराम प्रसाद मुंजुमकर उपस्थित होते.