आगीत तणसीचे ढिगार जळून खाक : अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अचानक आग लागल्याने तणसीचे ढिगार जळून खाक झाल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने ग्रापमंचायत पदाधिकाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवित आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळण्यात यश आले.
कुरुड येथील होळी चौकातील नागठाना या परिसरात काही घरालगत दाने यांचा वाडा असून त्यांच्या जनावरांसाठी जवळपास तणीस ठेवण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास एकाएक तणशीच्या ढिगा-यातून धुर निघताना नागरिकांना निदर्शनास आले. लागलीच याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा ग्रापं सदस्य अविनाश गेडाम यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता देसाईगंज येथील नगरपरिष अग्निशामक दलाशी संपर्क साधून आगीची कल्पना दिली. तत्काळ अग्निशमक दलाने घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत आगीने उग्ररुप धारण केले होते. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी ग्रापं सदस्य अविनाश गेडाम, ग्रामविकास अधिकारी संजय चलाख, गुड्डू राऊत, नगरपरिषदचे वाहन चालक भारत खरकाटे, फायरमन राजु निंबेकर, प्रेमचंद चव्हाळे, सुनील नाकाडे उपस्थित होते.