२०२० पासून बसफेरी बंद ; थेट उपराजधानीत जाण्यासाठी कुरखेडा ते नागपूर बससेवा सुरू करा

शहर विचार मंचाचे बसस्थानक प्रमुखास निवेदन

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : कोरची-कूरखेडा ते नागपूर ही बसफेरी 2020 पासून बंद असल्याने कुरखेडा तालुक्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य वाहतूक महामंडळाने प्रवाशांची असूविधा लक्षात घेता कुरखेडा ते नागपूर थेट बस सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शहर विचार मंचाचा पदाधिकाऱ्यांनी कुरखेडा येथील बसस्थानक प्रमुख राजेश राठोड यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोरोना कालखंडापूर्वी कोरची-कुरखेडा ते नागपूर ही थेट बस सेवा उपलब्ध होती. मात्र, कोरोना कालावधीत सन २०२० पासून बंद पडलेली ही बसफेरी पूर्ववत पुन्हा सूरूच झाली नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना नागपूर प्रवास करताना अधिकचा शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. राज्याचे उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर येथे व्यावसायिक, राजकीय, नातेसंबध तसेच आरोग्याच्या कारणाकरीता येथील नागरिकांना नियमीत नागपूरचा प्रवास करावा लागतो तसेच नुकतेच राज्य शासनाने महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात एसटी प्रवास योजना सूरू केली आहे. त्यामुळे सूरक्षित व आर्थीक बचतीमूळे महिला वर्गाचा खाजगी वाहनापेक्षा एसटी बसने प्रवासाचा कल वाढलेला आहे. मात्र, त्यांना थेट बस सेवा उपलब्ध नाही. त्रूटक प्रवासामूळे प्रवाशांना शारिरीक व मानसिक त्रास होत आहे. त्यामूळे येथील प्रवाशांना होणारी अडचण लक्षात घेता कूरखेडा ते नागपूर ही थेट बस सेवा सूरू करण्यात यावी, याकरीता विचार मंचाचा पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक प्रमूखाशी चर्चा करून प्रवाशांची अडचण निदर्शनात आणून दिली व मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपूरावा करीत थेट बस सेवा सूरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी शहर विचार मंचाचे संयोजक अध्यक्ष माधवदास निरंकारी प्रवक्ता अॅड उमेश वालदे, सदस्य डॉ. सतिश गोगूलवार, रामभाऊ वैद्य, मोहन मनूजा, डॉ. जगदीश बोरकर, सिराज पठान, प्रा. विनोद नागपूरकर उपस्थीत होते .