नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसल्याने नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने शेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे उघडकीस आली आहे. अमल महानंद बाला (54) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमल बाला हे खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न न निघाल्याने त्यांचेवर मानसीक आघात बसला होता. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपल्याच शेतालगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती ग्रामस्थांनी मुलचेरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतक शेतकरी अमल बाला याचे पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार असून त्यांच्या अकाली जाण्याने बाला कुटूंबियांवर डोंगर कोसळले आहे. शासनाने मृतकाच्या परिवारास तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामवासीयांकडून होत आहे.