खळबळजनक : संतापलेल्या घरजावयाने चिरला आजी सासुचा गळा

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूचा गळा चिरल्याची खळबळजनक घटना बुधवारी, रात्री 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील आंधळी येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुरखेडा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. सुनील कुमराज शेंडे (28) रा. लेंढारी असे आरोपीचे नाव आहे तर लिलाबाई मडकाम असे गंभीर जखमी आजीसासुचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुनील शेंडे हा आपल्या पत्नीसह आंधळी येथील लिलाबाई मडकाम आजी सासुकडे राहत होते. मात्र, सुनील दारू पिऊन नेहमी पत्नीशी भांडण होता. या भांडणाला वैतागून आजी लिलाबाई यांनी आरोपीला 28 मार्च रोजी घर सोडून जाण्याचे बजाविले होते. त्यानंतर तो आपल्या गावी लेंढारी येथे निघून गेला होता. परंतु बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तो पुन्हा आंधळी येथील घरी पोहचून दार ठोठावले. पत्नीने दार उघडकले असता तो हातात चाकु घेऊन उभा होता. यावेळी आजीने त्याला येथून निघून जाण्याचे सांगताच संतापाच्या भरात सुनीलले आजीसासुवर हल्ला चढवित तिचा गळा चिरला. आरडाओरड करताच शेजारी धावून आल्याने आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. जखमी आजीवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी आरोपी विरोधात गून्हा दाखल करीत अटक केली. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटिल यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत.