जिल्हाभरात जय श्रीरामाचा जयजयकार ; रामनवमीनिमित्य शोभयात्रेत चढला ‘भगवा रंग’

विविध मंदिरात उसळली भाविकांची गर्दी
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शहरासह जिल्हाभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्य आज, बुधवारी जिल्ह्यातील श्रीराम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भगव्या रंगाचे आवेश ओसंडून वाहतांना दिसला. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामाच्या जयंतीनिमित्य काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’ च्या जयजयकाराने शहर दुमदुमल्या गेले.
कोरोना महामारीनंतर मागील वर्षीपासून विविध धार्मिक उत्सवासह सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव रामनवमी म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विश्व हिंदू परिषद बजरंग दल व रामनवमी सेवा समितीच्या वतीने गडचिरोली शहरातील चारही राष्ट्रीय महामार्ग मुख्य इंदिरा गांधी चौकापासून केसरी पताक्यांनी सजविण्यात आले होते. सकाळपासून श्रीराम मंदिरासह सर्वच मंदिरात रामधून ऐकायला येत होती. शहरातील रामपूरी वार्ड, रामनगर, सर्वोदय वार्ड, कात्रटवार आदी परिसरातील राम मंदिरात भाविकांनी पुजाअर्चनेसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी आयोजकांकडून भाविकांसाठी महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामनवमी सेवा समितीद्वारे शहरातील नगर परिषदेपासून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सर्वप्रथम प्रभू श्रीरामाच्या प्रतिमिचे आ. डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या हस्ते विधिवत पुजन करण्यात आले. सदर शोभायात्रेने शहरातील चारही मुख्य मार्गावरुन मार्गक्रमण केले. शोभायात्रेत विविध झाकींचे प्रदर्शन करण्यात आले होते. या झाकीने भाविकांचे मन मोहून घेतले.
रामधूनाने शहरात भक्तीमय वातावरण
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच रामनवमी सेवा समितीने रामनवमी उत्सव भव्यदिव्य असा केला. याअंतर्गत शहरातील इंदिरा गांधी चौकापासून चारही राष्ट्रीय महामार्गा केसरी पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच चारही मार्गावरील लाऊडस्पीकरवर सकाळपासून सुरु झालेल्या रामधून व विविध धार्मिक गीतांनी संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्मिती केली.
युवा वर्ग बेभान होऊन थिरकली
सायकाळी 6.30 वाजता स्थानिक नगर परिषद कार्यालयापासून अभिनव लॉनपर्यंत शोभायात्रा काढण्यात आलीर. या शोभयात्रेदरम्यान फटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच डीजे, ढोल, ताशाच्या आवाजाने संपूर्ण आसंमत दुमदुमला गेला. शोभायात्रेदरम्यान विविध प्रकारच्या झाकीने भाविकांना आकर्षित केले. तर भगवान श्रीराम यांचेवर आधारित विविध गितांवर तरणाई बेभान होऊन थिरकली.