उद्या सर्चमध्ये विविध आजारांवर ओपीडी : मुंबई, नागपुरातील तज्ञ डॉक्टर करणार उपचार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील चातगाव स्थित सर्च रुग्णालयात १ एप्रिल रोजी वेदना व्यवस्थापन, पोटविकार व बालरोग सर्जरी ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ओपीडीच्या माध्यमातून विविध आजारग्रस्त रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.
शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे आणि उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बघता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात वेदना व्यवस्थापन ओपिडी राहणार असून ही ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होईल. या ओपीडीचे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे करतील. पोटविकाराचा रोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यायामाचा अभाव, फायबर कमी असलेला आहार घेणे, प्रवास किंवा नित्यक्रमातील इतर बदल, मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ खाणे, ताण तणाव असणे, औषधांचा अतिवापर करणे, अँटासिड औषधे घेणे, दारू पिणे अशा कारणांमुळे पचनसंस्थेशी निगडीत विकार वाढत आहेत. तसेच बालरोग असलेल्या रुग्णांची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून ‘गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व बालरोग ओपिडीला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ. सिद्धार्थ धांडे व बालरोग तज्ञ डॉ. प्रतीक राऊत यांच्या सहकार्याने ही ओपीडी होणार आहे. तरी आजारग्रस्त जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये, यासाठी हॉस्पिटलमध्ये पूर्व नोंदणी करावी. असे आवाहन सर्चकडून करण्यात आले आहे.