त्या’ घरजावयास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूवर हल्ला करीत तिचा गळा चिरल्याची घटना बुधवारी तालुक्यातील आंधळी (नवरगाव) येथे घडली होती. याप्रकरणी कुरखेडा पोलिसांनी आरोपीस अटक करून आज ३१ मार्च रोजी न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. सुनील कुमराज शेंडे (28) रा. लेंढारी असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सुनील शेंडे याने बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास लिलाबाई मडकाम नामक आजीसासुवर हल्ला चढवित तिच्या गळ्यावर वार केला. त्याच्या पत्नीने आरडाओरड करताच शेजारी धावून आल्याने आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी आरोपी विरोधात भादवि 307, 504, 506 अन्वये गून्हा दाखल करीत अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असतांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटिल यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने यांनी केला. आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या जखमी लिलाबाई मडकाम यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.