दारुचे पेट्रोलपंप म्हणून कुप्रसिद्ध गावाने घडवला नवा इतिहास

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुका मुख्यालयापासून 8 किमी अंतरावर वसलेले काकडयेली हे गाव एकेकाळी दारुचे पेट्रोलपंप म्हणून कुप्रसिद्ध होते. अशातच गावाला लागलेला डाग पुसण्यासाठी ग्रामस्थांनी मुक्तीपथच्या मार्गदर्शनात विशेष उपाययोजना करून एक नवा इतिहास घडविला. आता 2019 पासूनच गावातील अवैध दारूविक्री पूर्णतः बंद आहे.
काकडयेली या गावाला एकेकाळी दारुचे पेट्रोल पंप म्हणून संबोधले जात होते. जेमतेम 300 लोकसंख्या असलेला 95 घराची वस्ती, संपुर्ण आदीवासी समुदाय असलेला व डोंगराच्या कुशित वसलेले छोटेसे गाव. या गावातील सर्व लोक हे दारु विक्रीच्या व्यवसायात होते . फक्त पाच कुटंब दारु विक्रिच्या विरोधात होते. गावात सर्वांकडे शेती होती. परंतु दारु विक्रिच्या व्यवसायामुळे सर्व शेती ही ओसाळ पडली होती. दारू विक्रीच्या व्यवसायामुळे हा गाव बदनाम होता. दरम्यान, 2019 मध्ये मुक्तीपथच्या माध्यमातुन गावात गाव सभा घेउन मुक्तीपथ गाव संघटना गठीत करण्यात आली व संघटनेची कार्यशाळा घेउन ट्रेनींग देण्यात आली. गावात दारु बंदी बाबत वातावरण तयार झाले. दारूविक्रेत्यांवर आदीवासी नियमानुसार दंड ठरवण्यात आले व विक्रेत्यांना 8 दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सदर निर्णयाची अंमलबजावनी करीत लपुनछपून दारु विक्री करणाऱ्यांविरोधात गाव संघटनेच्या माध्यमातून अहिंसक कृती करण्यात आली. काही लोकांविरोधात पोलीस तक्रार सुद्धा केल्याने विक्रेत्यांचे मुसक्या आवळण्यात यश आले. आजही या गावातील महीला हप्त्यातुन एकदा फेरी मारून दारूबंदीचा आढावा घेतात. 2019 पासून आजतायागत या गावातील दारूविक्री बंद आहे. या गावात एक दिवशीय व्यसन उपचार शिबीर सुद्धा घेण्यात आले. त्यात 25 रुग्णांनी पुर्ण उपचार घेऊन दारूमुक्त होण्याचा निर्धार केला. अशाप्रकारे एकेकाळी कुप्रसिद्ध असलेल्या गावाने मुक्तीपथ च्या मार्गदर्शनाखाली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या गावातील लोक शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे आज हे गाव तालुक्यात आदर्श गावाच्या यादीत आहे.