३४८ जागांसाठी उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा : ७०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त

GADCHIROLI TODAY
-सहा केंद्रांवर पार पडली परीक्षा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या ३४८ जागांसाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा शांततेत व अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. यासाठी सहा परीक्षा केंद्रांवर जवळपास ७०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गडचिरोली पोलीस दलातर्फे ३४८ पोलीस शिपाई संबंधीत मैदाणी परीक्षा ६ ते १७ जानेवारीपर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण ३३०७ उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजीत करण्यात आलेली होती. यामध्ये पहिला पेपर सामान्य ज्ञान या विषयाचा सकाळी ८.३० ते १० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी-माडीया या विषयावर सकाळी ११ ते १२.३० वाजता दरम्यान घेण्यात आला. सदर लेखी परीक्षा गडचिरोली शहरातील शिवाजी इंग्लीश अकॅडेमी स्कुल गोकुलनगर, शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, शासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली, शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली, महीला महाविद्यालय चंद्रपुर रोड गडचिरोली व फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क या केंद्रावर घेण्यात आली. सर्व केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्ताकरीता ७०० चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती.
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ पासुन कोणताही उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावल्याचे दिसुन आले. सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.