छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा ; येणापूर येथील ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा पुढाकार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, महती कळावी यासाठी चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने जिप शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलपूर येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रतीक्षा अविनाश तलांडे हिने प्रथम तर खुशी प्रवीण आत्राम हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आत्राम यांचेहस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येनापूर चे संचालक संदीप कुरवटकर, संचालिका शुभांगी कुरवटकर, शिक्षक पडीशालावार , कोहळे व खाटे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
गणपुर रय्यतवारी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात सुद्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभव मोहन वाकुडकर, दिनेश साईनाथ चौधरी द्वितीय तर कोयल गिरीश भोयर हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक बावणे यांचे हस्ते पार पडला. यावेळी ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येनापूरचे संचालक संदीप कुरवटकर, शाळेतील शिक्षक वाघाडे , कडूकर, दुर्गे, शिपाई मुरलीधर सातर व विद्यार्थी उपस्थित होते.