शेतकऱ्यांची धाकधुक वाढली : जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : प्रादेशिक हवामान विभागाने 8 एप्रिलपर्यंत तीन दिवस गडचिरोली जिल्ह्याला येला अलर्टचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे.
मागील पंधरवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान, मका, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वादळी वारा व गारपीटीसह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतात जमा केलेले पीक पावसामुळे भिजले होते. त्यानंतर आता पुन्हा प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा इशारा दिल्याने शेतक-यांची धाकधुक वाढली आहे. 6, 7 व 8 एप्रिल रोजी जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळ वारा (वा-याचा वेग 30-40 किमी प्रतितास) राहील.