सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षणाची संधी ; आरसेटीमार्फत 30 दिवसाचे दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व बॅंक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली यांच्या विद्यमाने 30 दिवसांचे दुचाकी दुरुस्ती (टू व्हिलर मेकॅनिक) हे व्यवसायासाठीचे मोफत प्रशिक्षण 10 एप्रिलपासून संस्था कार्यालय बीओआय आरसेटी गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवण, चहा, नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविल्या जातील. प्रशिक्षणाचा कालावधी 10 एप्रिल ते 9 मे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहील. प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी/मार्कशिट, बीपीएल दाखला, स्वयंसहायता गटाचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र, रोजगार हमी जाब कार्ड [असल्यास], पासपोर्ट आकाराचे 4 फोटो, राशन कार्ड आदींची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम (9404188239), पुरुषोत्तम कुनघाडकर (8698758509)