बी-फॅशन प्लाझामध्ये महाप्रसादाचे वितरण

गडचिरोली : शहरातील प्रसिद्ध कपड्यांचे दुकान बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल येथे आज श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागरिकांसाठी महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. महाप्रसाद वाटप कार्यक्रमात व्यापारी संघटनेचे सचिव गुरुदेव हरडे, कोषाध्यक्ष तथा बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉलचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, हिमांशू देवकुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुलसंगे, मनोहर चलाख, मॉलमधील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.