चामोर्शी पोलिसांना अवैध धंद्यांवर आळा बसविण्यात यश ; दारुविक्रेत्यांवर 116 गुन्हे दाखल

GADCHIROLI TODAY
चामोर्शी : येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे रुजू होऊन अवघे चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात त्यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने अवैध दारूविक्रेत्यांवर व वाहतूक करणाऱ्यावर 116 गुन्हे दाखल करत 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरोधात कमी वेळात उत्तम कामगिरी करणारे चामोर्शी पोलिस ठाणे महाराष्ट्रातील पहिले पोलिस ठाणे ठरले आहे.
पोलिस निरीक्षक राजेश खांडवे हे पोलिस निरीक्षक म्हणून चामोर्शी पोलिस ठाण्यात 29 नोव्हेंबर 2022 रोजी रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरात व बिटात किरकोळ अवैध दारू विक्रेत्यांवर व वाहतूक करणाऱ्यावर 116 गुन्हे दाखल करत 137 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात शांतता पसरली आहे. ही कामगिरी पोलिस स्टेशनचे पोउपनि सुधीर साठे, महिला पोउपनि पल्लवी वाघ, पीएसआय तुषार पाटील, सहकारी पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे हे पोलिस ठाणे कमी वेळात उत्तम कामगिरी करणारे महाराष्ट्रातील पाहिले ठाणे ठरले आहे.
मला या पोलिस स्टेशनला येऊन अवघे चार महिने झाले. त्यावेळी अनेकांनी माझी भेट घेत शहर पोलिस हद्दीत काही प्रमाणात अवैध दारू विक्रेत्यांपासून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर कार्यवाही केली. त्यामुळे अवैध धंद्यावर आळा बसविण्यात यश आले असून यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य करावे.
-राजेश खांडवे, पोलिस निरीक्षक, चामोर्शी पोस्टे