त्रिमूर्ती चौक मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शहरातील गांधी वॉर्डातील त्रिमूर्ती चौक मित्र परिवारातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
त्रिमूर्ती चौक मित्र परिवारातर्फे रामनवमी, शिवजयंती व हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदाही हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या भविकांसह वॉर्डातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी मित्र मंडळाचे
सागर वासेकर, अंकित गव्हारे, बबलू शर्मा, पुरुषोत्तम कसनवार, अजय नैताम, अनुप खडसे, प्रवीण खडसे, अनिकेत चन्नावार, पराग खडसे, नरेंद्र रणदिवे, आशिष नैताम, मुन्ना बाबनवाडे, शंकर बारसागडे, पराग वासेकर, हेमंत कोल्हे, महेश पेटकर, पपेश पोडचलवार, सारंग खडसे, सचिन खडसे, सागर खडसे, विशाल पुरणवार, सचिन मंचेलवार, रोशन खडसे, मनोज पिल्लारवार, महेंद्र उंदिरवाडे, देवेंद्र मेश्राम, मुरली कसनवार, मनोज भोयर, सुरज भोयर, गणेश चिम्मलवार यांच्यासह वार्डातील युवक उपस्थित होते.