पेरमिली परिसरात वादळी पाऊस ; घरांचे नुकसान

GADCHIROLI TODAY
अहेरी : तालुक्यातील पेरमिली परिसराला गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. एकाएक झालेल्या वादळी पावसाने पेरमिली परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पेरमिली येथे या वादळामुळे काही झाडे उन्मळून घरावर कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
पेरमिली परिसरातील वातावरणा एकाएक बदल होत चक्रीवादळ सुटले. यामुळे गावातील जनजीवन अस्तव्यस्त झाले. या वादळी पावसात पेरमिली येथील झाडा विद्यूत तारांवर कोसळल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर या वादळामुळे काही नागरिकांच्या घरावरील छत उडून गेले. पेरमिली येथील संजय सडमेक यांच्या राहत्या घरासमोरील ताडाचे झाड घरावर कोसळल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच गावातीलच वसंत तोरेम यांच्या घरावरील पत्रे व कौले तुटल्या गेली. तसेच गोठ्यावरही झाड कोसळल्याने त्यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. संबंधित नुकसानग्रस्तांना तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.