आरटीई मोफत प्रवेशासाठी 12 एप्रिलपासून मिळणार संदेश

कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवड यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. प्रवेशासाठी निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना 12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजतापासून संदेश पाठविले जाणार आहेत.
शिक्षक हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 66 शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी. या शाळांमध्ये रिक्त जागांवर पात्र बालकांना प्रवेश देण्यासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. निवडीसाठी पात्र ठरलेल्या अर्जांची सोडत जाहीर करण्यात आली. निवड प्रक्रियेचे काम सुरु असल्याने आरटीईचे पोर्टल सद्यस्थितीत बंद असल्याचे संकेतस्थळावर शुक्रवारी पालकांना लघू संदेश 12 एप्रिलपासून पाठविले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित शाळेत प्रवेश घेता येणार आहे. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात 66 शाळांमध्ये 365 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या पाल्यांच्या पालकांनी प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने गतवेळी काही जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने प्रवेशाबाबत पालकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक सत्रात पूर्ण क्षमतेने प्रवेश होण्याची शक्यता आहे.