आष्टी पोलिसांची कारवाई : कारसह 6.96 लाखाचा मुद्देमाल जप्त

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : आष्टी पोलिसांनी आष्टी-आलापल्ली मार्गावरील मार्कंडा (कं.) मार्गावर नाकाबंदी करून दारु भरलेल्या कारसह 6 लाख 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई 9 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पार पाडली. याप्रकरणी रतन निमगडे रा. चंद्रपूर या दारुतस्कराला अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असून पोलिस विभाग दारु तस्करी व विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. अशातच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दारु तस्करी होत असल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनासह लाखो रुपयांची दारु जप्त केली. या कारवाईत 1 लाख 96 हजार 600 रुपयांची देशी-विदेशी दारु व 5 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 6 लाख 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आष्टी पोलिसांच्या या कारवाईने दारु विक्रेते व तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर कारवाई आष्टीचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के, तोडासे, रायसिडाम, तिमाडे, मेश्राम आदींनी पार पाडली