अतिदुर्गम मांड्रा गावाला माजी जिप अध्यक्षांची भेट : ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

GADCHIROLI TODAY
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मांड्रा येथे जिपचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील पाण्याची समस्या, रस्ते, नाल्या आदी प्रमुख समस्यांचा पाढाच वाचला असता, समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले.
यावेळी मांड्रा ग्रापंचे सरपंच विलास कन्नाके, पंसचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम, आविस सल्लागार माणिक मडावी, महादेव मडावी, इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रापं सदस्य गुलाबराव सोयाम, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, ऍड.एच. के. आकदर, सत्यम नीलम, संजय सुरमवार, प्रमोद कोडापे, विनोद दूनालावार, भुजंगराव आलाम, आशिष सडमेक, बबी चौधरी, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.