उद्या ‘सर्च’ रुग्णालयात सिकलसेल ओपीडी ; डॉ. कल्पिता गावित देणार सेवा

 

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात आले आहे. सिकलसेल ओपीडी ही दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारला असेल. १२ एप्रिल या दिवशी सर्च रुग्णालयात ओपीडी घेण्यात येणार आहे. यासाठी डॉ. कल्पिता गावित व  टीम उपस्थित राहतील.
सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच मोफत तपासणी व औषधोपचार या ओपिडीमध्ये केल्या जाईल. काळाची गरज समजून चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘सिकलसेल ओपीडी’ला सुरुवात करण्यात आली आहे. १२ एप्रिल या दिवशी होणाऱ्या ओपीडीचा सिकलसेल आजाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च‘कडून करण्यात येत आहे.