शिवाजी महाविद्यालयात वक्तृत्व व गीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित शिवाजी महाविद्यालयात बुधवारी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष सप्ताहानिमित्त १० ते १५ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग दर्शविला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जे. मेश्राम होते. कार्यक्रमास प्रा. जान्हवी कहाळे व प्रा.कुलदीप पोरटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.जी.एस.राऊत तर आभार प्रा.पुजा खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.