कुरखेडातील शेकडो लोकांनी जिल्हा मुख्यालयात मांडली विजेची समस्या

GADCHIROLI TODAY
– आम आदमी पक्षाचे नेतृत्व
गडचिरोली :विद्युत पुरवठा १३२ केव्हीवरून करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात कुरखेडा येथील शेकडो शेतकरी व नागरिकांनी जिल्हा मुख्यालयात धडक देत वीज वितरण व पारेषण विभागाचे अधीक्षक अभियंता यांना तालुक्यातील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. सोबतच निवेदन सादर करून मागणीकडे लक्ष वेधले.
कुरखेडा तालुक्यात नेहमी विद्युत भारनियमन व विविध कारणाने वीज पुरवठा खंडित केला जातो. या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासामुळे शेतकरी व निवासी विजधारक खूप कंटाळले आहेत. या वीज खंडित पुरवठ्याबाबत गंभीर दखल घेवून विद्युत वितरण व पारेषण विभागाने तालुक्यातील 33 केव्ही वीज जोडणी 132 केव्ही मध्ये रुपांतरीत करून तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी जिल्हा मुख्यालयात धडक दिली.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोलाला येथील एका शेतकऱ्याने अनियमित वीज भारनियमनाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. तालुक्यातील अनियमित वीज पुरवठा व अघोषित भारनियमनाला कंटाळून येथील उपविभागीय अभियंता यांच्या निवासस्थानी घेराव घालत मोठा जमाव केला होता. वेळीच पोलिस प्रशसन व स्थानिक आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थिती करीत जमावासोबत संवाद साधून परिस्थिती हाताळली होती. यावेळी झालेल्या चर्चेत कुरखेडा येथे 33 केव्ही वीज पुरवठा कमी पडत असून 132 केव्ही वीज जोडणी सुरू झाल्यास तालुक्यातील वीज समस्या मार्गी लागू शकते असा निकष निघाला. तालुक्यात सध्या मागणीपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने वीज भारनियमन, कमी व्होल्टेज, वारंवार वीज खंडित होणे, वीज जोडणी मध्ये बिघाड होणे अश्या समस्या उद्भवत असतात. या संपूर्ण समस्येचे एकमात्र समाधान म्हणजे तालुक्यातील वीज जोडणी 132 केव्ही होणे खूप गरजेचे आहे. यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा मुख्यालय गाठून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
निवेदन सादर करतांना आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसागडे, कुरखेडा तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, तालुका सचिव ताहीर शेख, जिल्हा युवा कार्यकारी सदस्य हिरालाल चौधरी, रंजना मेश्राम, हिरालाल शेंडे, निळकंठ मेश्राम, रामचन्द्र जांभूळकर, सुनीता तावाडे, चक्रधारी शेंडे, रेखा नीमजे, शंकर ठाकरे, माधुरी चौधरी,रमशिला गुहाल, कोमल घोडीचोर, उषा झाडे, गीताबाई गुहाल, जिजाबाई कापगते, जयचंद्र राऊत, जयंत गरमडे, मधुकर गोटमारे, सिद्धार्थ आघात, पंकज राऊत, वंचडाबाई कोसारे, पुष्पा सोरते, शशिकला राऊत, प्रतीक रामटेके, रवींद्र नेवारे, छगनीबाई गणबोईर, रवींद्र बोदेले, मनोरमा लाडे, अनिल कन्नाके, मुरलीधर कसारे, नलिनी जंनबंधू, मसाजी इंदुरकर, रमेश लाडे, नंदा बेहार, शशिकला खोब्रागडे, कुसुम साहारे, शिला वंजारी, कमलाबाई दुफारे, संगीता जांभूळकर, मंदा बारसागडे, विलास मांजरे, रंजना चौधरी, सत्यवान राउत, पवनकुमार राउत, शकुंतला शेंडे, नंदा साहारे, आशा राखुंडे, नामदेव ठाकरे, प्रेमिला देशमुख, किशोर चौधरी, सुनंदा चौधरी, भागरथा टेंभुर्ण, सारुबाई हलामी, महागाबई घोडाम, गुरुदेव लाडे, जास्वंदां नेवारे, पंचशिला सहारे, कसारेबाई आदी उपस्थित होते.
जागेअभावी सबस्टेशनचे काम रखडले
गडचिरोली येथे अधीक्षक अभियंता यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी कुरखेडा येथील शिष्ट मंडळाला सांगितले की, १३२ केव्ही वीज पुरवठासाठी प्रस्ताव मंजूर असून तालुक्यात जागा शोधणे सुरू आहे. या प्रकल्पाला उभरण्याकरिता किमान २५ एकर जागेची आवश्यकता असते. एवढी मोठी जागा उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प उभारणीचे काम रेंगाळत असल्याचे ही त्यांनी सांगितले. वीज महापारेषणकडून जागेचा शोध सुरू असून जागा उपलब्ध होताच लवकरच प्रकल्प उभारणी करून १३२ केव्ही वीज पुरवठा सुरू करू, असे आश्वासन यावेळी दिले.