दुचाकींची समोरा-समोर धडक ; दोन जखमी 

GADCHIROLI TODAY
धानोरा : दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात (accident) दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना धानोरा-रांगी मार्गावरील सोडे येथील आश्रम शाळेजवळ 12 एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रफुल तोफा (24) रा.तुकूम, देवदास पदा (३०) रा.नवरगाव असे जखमींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील तुकूम येथील प्रफुल तोफा हा आपल्या वैयक्तिक कामासाठी जांभळीकडे काही दुचाकीने जात होता. अशातच दुसरी दुचाकी नवरगावमार्गे धानोरा शहरातकडे येत होती. धानोऱ्यावरून अवघ्या दोन किमी अंतरावर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात देवदास पदा हा सुद्धा जखमी झाला. अपघाताच्यावेळी देवदास पदा यांच्या दुचाकीवर एक महिला सुद्धा होती. मात्र, सुदैवाने सदर महिलेला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.