GADCHIROLI POLICE । ७.५० लाख किमतीच्या गहाळ ४९ मोबाईलचा लावला शोध

-सायबर पोलीस ठाण्यातून मोबाईलचे वाटप
गडचिरोली : गडचिरोली पोलिस अधिक्षक GADCHIROLI POLICE कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तब्बल ४९ हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात यश प्राप्त केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कामगिरीमुळे संबंधित मोबाइलधारकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते.
तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन हाताळतांना, प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली जाते. या बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो. मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. सन २०२२ या वर्षात एकुण १५० मोबाईल ज्यांची किंमत जवळपास २२ लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवुन ते मोबाईल संबंधीत व्यक्तीना देण्यात आले. तसेच सन २०२३ मध्ये एकुण ४९ मोबाईलचे वाटप करण्यात आले असुन अंदाजे किंमत एकुण ७.५० लाख रुपये एवढी आहे. शोधून काढलेले ३१ मोबाईल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी, पोउपनि निलेश ठाकरे, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार वर्षा वहिरवार, संगणी दुर्गे, गायत्री नैताम, किरण रोहणकर, योगेश खोब्रागडे, सचिन नैताम यांनी पार पाडली.
सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे : नीलोत्पल
सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.