जिल्ह्याच्या दक्षिण भागात वादळासह अवकाळी ; किराणा दुकानावरील टिनपत्रे उडाले

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे गडअहेरी येथील एका किराणा दुकानाचे संपूर्ण टिनपत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.
मागील महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पारा वाढला असतानाच पुन्हा हवामान विभागाने दोन दिवस येलो अर्लट दिला आहे. इशा-यानुसार आज अहेरी तालुक्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे गडअहेरी येथील कुरुकुडा सुखदेव दुर्गे यांच्या किराणा दुकानाचे संपूर्ण टिनपत्रे उडून गेले. तसेच बाजुलाच असलेल्या गौतम इलेक्ट्रानिक दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.