देसाईगंज पोलिसांची कारवाई ; चारचाकी वाहनासह पावणे चार लाखाची दारू जप्त

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : ब्रम्हपुरी येथून देसाईगंजकडे मारुती सुझुकी कंपनीच्या चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी रेल्वे क्रॉसिंग ते जुनी वडसाकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून चारचाकी वाहनासह ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवारी केली. याप्रकरणी रॉबिनसिंग महेंद्रसिंग बावरी (२०), मिथुन भाऊराव नागापुर (२४) दोघेही रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
देसाईगंज पोलिसांनी रेल्वे क्रॉसिंग ते जुनी वडसाकडे जाणा-या रोड दरम्यान तात्पुरती नाकाबंदी करुन पाळत ठेवली. दरम्यान, एम. एच. ३१ सि. पी. ८१७६ या क्रमांकाच्या संशयास्पद चारचाकी वाहनाला थांबवून चौकशी केली असता, सदर गाडीच्या मागील डिक्कीमध्ये १६ खर्डाच्या बॉक्समध्ये १ लाख २८ हजारांची संत्री कंपनीची देशी दारू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी एक जुनी मारोती सुझुकी कंपनीची गोल्डन रंगाची चारचाकी वाहन किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये व अवैध दारू असा एकुण ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत रॉबिनसिंग महेंद्रसिंग बावरी, मिथुन भाऊराव नागापुर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन), कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशने पोलीस निरीक्षक रासकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार कुमोटी, ढोके यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहे.