गडचिरोलीसह विदर्भातील ७२० स्पर्धकांनी ‘समता दौड’तून डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : भारतीय संविधानात अंतर्भूत असलेले ‘समता’ हे मुलभूत मूल्य प्रत्येकाच्या मनात रुजावे आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त स्थानिक इंदिरा गांधी चौकात ‘समता दौड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यासह विदर्भातील ७२० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्थानिक इंदिरा गांधी चौकापासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत ही दौड ठेवण्यात आली होती. यावेळी समता दौडला मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी हिरवी झेंडी दाखविली. मुव्हमेंट फॉर जस्टीसचे सदस्य गौतम मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर चौकात या दौड स्पर्धेचा समारोप करण्यात आला. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते रोहिदास राऊत, आसान्या ग्रुपचे संचालक प्रकाश शेंडे, आसान्या फौंडेशनच्या संचालिका मोनिका भडके, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलास नगराळे आणि वसंत कुलसंगे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी समता दौडचे महत्व स्पर्धकांना पटवून दिले. तसेच मुव्हमेंट फॉर जस्टीस या समन्वय संघटनेच्या लोगोचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुव्हमेंट फॉर जस्टीसचे सुकाणू समिती सदस्य डॉ. दिलीप बारसागडे यांनी केले तर समन्वयक ऍड. सोनाली मेश्राम यांनी संचालन केले. आभार सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश अंबादे यांनी मानले. या दौड स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुव्हमेंट फॉर जस्टीसचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, विनोद मडावी, प्रा. गौतम डांगे, देवेंद्र सोनपिपरे, प्रतीक डांगे, हंसराज उंदीरवाडे, डॉ. संतोष सुरडकर, ऍड. भावना लाकडे, नरेंद्र वाडे, डॉ. उज्वला शेंडे, रुपेश लाडे, देवानंद फुलझेले, धम्मराव तानादु, सुधीर वालदे, नागसेन खोब्रागडे, तुषार भडके यांनी प्रयत्न घेतले. या उपक्रमासाठी असान्या ग्रुपच्या संघमित्रा शेंडे, साची शेंडे, मोनिका निम्बेकर, देवेंद्र रायपुरे, मनोज देवकुले, दोडिया, डॉ. बाळू सहारे, डॉ. यशवंत दुर्गे यांनी विशेष सहकार्य केले.