नक्षल्यांनी अडवली वाट, पोलिसांच्या प्रयत्नातून वाहतूक सुरळीत

– एटापल्ली-गुरुपल्ली मार्गावरील घटना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एटापल्ली-गुरपल्ली रस्त्याच्या मधोमध झाड तोडून टाकले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ बंद होती. याची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांना तत्काळ घटनास्थळ गाठून झाड हटवून वाहतूक पूर्ववत सुरु केली.
एटापल्ली तालुका आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त आहे. या तालुक्यात नक्षलवादी हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी एटापल्ली-गुरुपल्ली मार्गावर झाड तोडून मार्ग बंद केला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्त्यावरील झाड हटवले. त्यामुळे एटापल्ली-गुरुपल्ली मार्गावरील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू झाली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.