केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात कॉंग्रेसचे ‘नरेंद्र मोदी जवाब दो’ आंदोलन

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेमध्ये 40 जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या या हुकूमशाही विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात ‘मोदी जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले? भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली? पुलवामा घटनेत वापरले गेलेले 300 किलो आरडीएक्स कुठून आले? पुलवामा घटना व 40 जवानांचे बलिदान हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते का? मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी 300 कोटी रुपयांची ऑफर का दिली? अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मोदींनी उत्तर द्यावे? शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या तीन काळ्या कायद्यांबद्दल आणि हे काळे कायदे वापस घेण्यासाठी आंदोलन करताना शहीद झालेल्या 750 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे. पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानीसाठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. आंदालनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला प्रदेश सचिव भावना वानखेडे, महिला अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल उपाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, पांडुरंग घोटेकर, समय्या पशुला, सुनील चडगुलवार, सुरेश भांडेकर, अनिल कोठारे, दत्तात्रय खरवडे, घनश्याम मुरवतकर, सुधाकर मेश्राम, ढिवरू मेश्राम, निकेश कामीडवार, बाळुजी किनेकर, हरबाजी मोरे, महादेव हिचामी, नीलकंठ पेंदाम, ज्ञानेश्वर पोरटे, आशिष नैताम, प्रफुल आंबोरकर, गणेश कोवे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.