मामाच्या गावाला जाऊया’ हे अनाेखे शिबिर ; पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच मिळणार प्रवेश

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : आजच्या बच्चेकंपनीने माेबाईल, टिव्हीच्या आभासी जगातून बाहेर पडून आपल्या हरवत चाललेल्या प्राचीन संस्कृतीचा, ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यावा, लुप्त हाेत असलेले अस्सल भारतीय खेळ पुन्हा खेळावे, निसर्गाच्या सानिध्यात रमत नव, नव्या गाेष्टीही शिकाव्या यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रिन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने मामाच्या गावाला जाऊया हे अनाेखे शिबिर आयाेजित करण्यात आले आहे.
चांदाळा गावातील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत 28, 29 व 30 एप्रिल राेजी आयाेजित या तीनदिवसीय शिबिरात लगाेरी, विटी-दांडू, कंचे, गुलेर असे हरवत चालेले अनेक खेळ शिबिरार्थी खेळतील. शिवाय पक्षिनिरीक्षण, आकाशदर्शन, विविध प्रकारच्या चित्रकला, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तूंपासून नव्या टिकाऊ वस्तू तयार करणे, निसर्ग विज्ञान, अंतराळ संशाेधन अशा अनेक गाेष्टी शिकणार आहेत. तसेच या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी फक्त पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी गडचिराेली-चामाेर्शी मार्गावरील सुभाष फाेटाे स्टुडीआे येथे किंवा ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे 9673516419, मिलिंद उमरे 9423422348, शेमदेव चाफले 9422154071, सुभाष धंदरे 9420512980, सुधीर गाेहणे 94234223351 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.