इसमाची गळफास घेवून आत्महत्या

GADCHIROLI TODAY
देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड येथील एका इसमाने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गेंदलाल किसन ठाकरे (45) रा. कुरुड असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेंदलाल ठाकरे यांच्या घरी काही नागरिक गेले असता, घराच्या आतमधून द्वार बंद असल्याचे आढळून आले. बराच वेळ गेंदलाल ठाकरे यांना आवाज देऊन त्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने काही जणांनी गावातील पोलिस पाटील मंगेश मडावी यांना माहिती दिली. पोलिस पाटील व नागरिकांनी दार उघडुन बघितले असता, गेंदलाल ठाकरे हे घरातीलच एका खोलीमध्ये घळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. लगेच देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण कळले नसून पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.