चारचाकीचा अपघात : बूथ प्रमुखाचा मृत्यू तर तीन महिला जखमी

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : चारचाकी वाहन पलटल्याने कुरखेडा तालुक्यातील भगवानपुर येथील भाजपचे बूथ प्रमुख रमेश मस्के (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू तर तीन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना देसाईगंज शहराजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, भगवानपुर येथील रमेश मस्के हे काल दुपारी कुटुंबीय व नातेवाईकांसोबत अर्जुनी मोरगाव येथे लग्नाला जात असताना चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोरनगरच्या डांबरी रस्त्यावरच गाडी पलटली. या अपघातात रमेश मस्के यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनात बसलेल्या तिन महिला गंभीर जखमी असून दोन महिलांवर गडचिरोली येथील रुग्णालयात तर एका महिलेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील रुग्णालयाकडे धाव घेत घडलेल्या अपघाताची माहिती जाणून घेत कुंटुबिय व नातेवाकाचे सांत्वन केले. एक सच्चा बूथ प्रमुख आपण गमावल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.