ग्रामपंचायत पोट निवडणूक 2023 ; आता मतमोजणी होणार ‘या’ तारखेला

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात घोषित करण्यात आले होते.सदर निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत बदल करण्यात आले असून आता मतमोजणी 19 ऐवजी 20 मे रोजी होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून मतमोजणीची तारीख 19 मे घोषित करण्यात आली होती. परंतु गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मतमोजणी सुरळितपणे पार पडावी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील मतमोजणी दिनांक 19 ऐवजी 20 मे रोजी करण्यात येणार आहे. असे उपसचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी कळविले आहे.