बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करा ; खा. नेते यांची राज्यपालांकडे मागणी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करावी व राज्यातील पुनर्वसन बंगाली समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र 2019 च्या बार्टी सर्वेक्षण अहवालानुसार द्यावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मुंबई येथे महामहीम राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ओबीसींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, वनपट्ट्यासाठी ओबिसींना असलेली तिन पिढ्यांची अट रद्द करून प्रलंबित प्रकरण निकाली काढावे, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जनगणना करावी, महाराष्ट्र राज्यात 1971 नंतर बंगाली समाजाचे मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यात पुनर्वसन झालेले आहे. बंगाली समाजातील नमोशुध्द पोंड्रो व राजवंशी हे अनुसूचित जातीमध्ये मोडतात. परंतु, इतर राज्यांप्रमाणे त्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना शासनांच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. सन 2019 मध्ये बार्टीतर्फे सदर संबंधी सर्वेक्षण झालेले आहे. सदर सर्वेक्षण केंद्र शासनास पाठवुन उक्त घटकांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र पुर्ववत मिळण्याचा मार्ग सुकर करण्यात यावा आदी मागण्या खासदार नेते यांनी राज्यपालांकडे केल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अजय सोनुले, सुरेश राठोड उपस्थित होते.